‘नारी शक्ती वंदन’: जुहू येथे ‘भाजपा जैन सेल – महिला विंग’ चे दिमाखात उद्घाटन
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या ‘नारी शक्ती वंदन’ या महान दूरदृष्टीला आणि विचारांना पुढे नेत, काल जुहू येथे ‘भाजपा जैन सेल – महिला विंग’ चा भव्य उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीने महिलांना केवळ मतदार न मानता नेहमीच ‘राष्ट्र शक्ती’ म्हणून गौरव केला आहे. जैन समाजातील महिलांचे हे संघटन आगामी काळात केवळ सामाजिकच नव्हे, तर राष्ट्रीय कार्यातही आपले महत्त्वपूर्ण आणि प्रगतीशील योगदान देईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. जेव्हा समाजातील स्त्री संघटित होते, तेव्हा संपूर्ण राष्ट्राचा विकास होतो.या दिमाखदार सोहळ्याला माझ्यासोबत भाजप मुंबई अध्यक्ष आमदार श्री अमीत साटम जी, श्रीमती अमृता फडणवीस जी, अंधेरीचे आमदार श्री मुरजी पटेल जी, मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, श्री संदीप दादा भंडारी, डॉ. राजेंद्र चतुर्वेदी आणि मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या. उद्घाटन सोहळ्यासोबतच पार पडलेल्या ‘भक्ती जॅमिंग कॉन्सर्ट’ने संपूर्ण वातावरणात एक अनोखी सकारात्मक ऊर्जा आणि देशप्रेमाचा संदेश पसरवला. या सुंदर आणि यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक सी. व्ही. शाह व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. जैन सेल महिला विंगच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आणि भगिनींना यशस्वी वाटचालीस अनंत शुभेच्छा!





