दादर ‘वसंत स्मृती’ येथे मुंबईतील भाजपा आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Posted by admin
Category:

दादर येथील ‘वसंत स्मृती’ येथे मुंबईतील भाजपा आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी राजकीय आव्हाने, पक्षाची धोरणात्मक आखणी आणि मुंबईतील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.मुंबईकरांच्या स्थानिक समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि जनहितार्थ उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी भाजप मुंबई पूर्णपणे सज्ज असून, त्या दृष्टीने ठोस कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.या बैठकीस राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी आणि मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, विधान परिषदेचे गटनेते मा. श्री. प्रवीणभाऊ दरेकर जी, मुंबई अध्यक्ष श्री. अमीत साटम जी तसेच इतर सर्व वरिष्ठ आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे आणि महानगरपालिका सभागृह नेते श्री. गणेश खणकर यांनीही आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या बळकटीकरणावर भर दिला.

Leave a Reply

Open chat
Powered by