जनसंपर्क अभियानांतर्गत कच्छी भानुशाली सेवा समाज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
आज भारतीय जनता पार्टीच्या व्यापक जनसंपर्क अभियानांतर्गत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या जनसेवा, सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयांची, जनकल्याणकारी योजनांची आणि विकासकामांची माहिती समाजातील मान्यवर नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने घाटकोपर येथील श्री कच्छी भानुशाली सेवा समाज ट्रस्ट, भानुशाली वाडी, टिळक रोड येथे समाजातील प्रतिष्ठित मान्यवर श्री प्रेमजी भानुशाली, श्री दिनेश चंद्रा, श्री दामजी भानुशाली, श्री राजू भानुशाली, श्री जेराम भानुशाली, श्री नरेश सेठीया, श्री जितेंद्र भद्रा, सौ. भारती भानुशाली, श्री जितेंद्र भानुशाली, श्री समीर भानुशाली तसेच डॉ. हरेश चंद्रा यांची सदिच्छा भेट घेऊन स्नेहपूर्ण संवाद साधला.या भेटीदरम्यान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील देशहिताचे ऐतिहासिक निर्णय, पायाभूत सुविधांचा विकास, गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, युवकांसाठीच्या संधी, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत यांसारख्या विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच समाजहित, राष्ट्रहित आणि स्थानिक विकासाशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.






