घाटकोपर पूर्व: भाजपा जनसंपर्क कार्यालयात ‘जनता दरबार’ संपन्न
जनतेच्या विश्वासाचे ठिकाण
घाटकोपर पूर्व जनसंपर्क कार्यालयआज दिनांक १३ जून २०२६ रोजी माझ्या भाजपा घाटकोपर पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी आपल्या विविध समस्या आणि अडचणी मांडल्या. तसेच विद्याविहार पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतला. विविध एस.आर.ए. सोसायट्यांमधील प्रलंबित प्रश्न देखील जाणून घेतले.या सर्व समस्यांबाबत येत्या काही दिवसांत नागरिकांना सोबत घेऊन संबंधित अधिकारी वर्गासमवेत संयुक्त बैठक आयोजित करून सकारात्मक आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. जनतेच्या समस्या जाणून घेणे, त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून विकासकामांना गती देणे, हीच लोकप्रतिनिधी म्हणून माझी प्राथमिकता आहे.यावेळी नगरसेविका राखीताई जाधव, श्री. विनायक कामत, श्री. विकास कामत, श्री. भालचंद्र शिरसाट, श्री. रत्नम देवेंद्र, श्री. तुषार कांबळे, श्री. संघदीप केदारे, श्री. कुणाल देवेंद्र, श्री. संजय (बाबू) दरेकर, अनुज शाह, सागर वाघमारे, विद्युत काजी, तसेच श्रीमती अर्पिता शेलार, उपस्थित होते.










