घाटकोपर पूर्वमध्ये विद्यार्थ्यांना मोफत उत्पन्न व डोमिसाईल प्रमाणपत्रांचे वितरण — शैक्षणिक मदतीचा पुढचा टप्पा पूर्ण
दिनांक १५ व १६ मे २०२५ रोजी माझ्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकाराने “मोफत शालेय दाखले शिबिर” आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या शैक्षणिक गरजांसाठी आवश्यक असलेले दस्तावेज मिळवण्यासाठी अर्ज भरले.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शासकीय प्रक्रिया सुलभ करून आवश्यक कागदपत्रे मोफत व सहजपणे उपलब्ध करून देणे हा होता.
या शिबिराचा पुढचा टप्पा म्हणून, आज संबंधित विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्रे (Income Certificate) आणि डोमिसाईल प्रमाणपत्रे (Domicile Certificate) यांचे घाटकोपर कार्यालयात औपचारिकपणे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शासकीय योजना, प्रवेश प्रक्रिया आणि इतर शैक्षणिक लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
“विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत कधीच अडथळा येऊ नये, म्हणूनच अशा उपक्रमांची गरज आहे. भविष्यात देखील असेच शिबिरं आयोजित करून नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवली जाईल.”








