घाटकोपर पूर्वमध्ये मोफत दाखला शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद – शेकडो विद्यार्थ्यांना मिळाले आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र

Posted by admin
Category:

📚 घाटकोपर पूर्वमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित शेवटच्या मोफत दाखला शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
घाटकोपर (पूर्व) मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी काल, सोमवार २६ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेवटच्या मोफत दाखला शिबिरात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या शिबिराद्वारे विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र आणि स्थायिकतेचा दाखला (डोमिसाईल) ही शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे सुलभ आणि विनामूल्य देण्यात आली.
📍 स्थान: समर्थ सेवा संघ, वसंत व्यायाम शाळेजवळ, पंतनगर, घाटकोपर (पूर्व)
✅ विद्यार्थ्यांच्या सुविधा लक्षात घेऊन, अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची स्वतंत्र टीम मार्गदर्शनासाठी उपस्थित होती.
🎯 ही मोफत सेवा म्हणजे फक्त दाखल्यांचे वाटप नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला दिलेली योग्य दिशा होती.
या सुवर्णसंधीचा लाभ घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही पालकांनाही मनापासून धन्यवाद!
🎓 योग्य कागदपत्रं = पुढील शिक्षणाचा मजबूत पाया.
आपल्या घाटकोपर पूर्व मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी अशीच उपयुक्त आणि गरजेची पावले भविष्यातही उचलली जात राहतील.

Leave a Reply

Open chat
Powered by