घाटकोपरच्या विकासासाठी महायुतीचा निर्धार! टिळक रोडवरील भव्य जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Posted by admin
Category:

आज दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी घाटकोपर पूर्व येथील टिळक रोड नाका येथे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ. रितुताई तावडे, सौ. राखीताई जाधव व श्री. धर्मेश गिरी यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभेला उपस्थित राहिलो. सभेला संबोधित करताना मी महाविकास आघाडी सरकारच्या कोविड काळातील अपयशाची जनतेला आठवण करून दिली. त्या कठीण काळात मुंबईकरांना ज्या अमानवी त्रासाला सामोरे जावे लागले, त्या कडू आठवणी आजही जनतेच्या मनात ताज्या आहेत. मात्र याच काळात भाजपा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घाटकोपरसह संपूर्ण मुंबईत मदतीचे मजबूत जाळे उभे करून जनतेची अहोरात्र सेवा केली, हेही जनतेला ठाऊक आहे.आज घाटकोपरसह मुंबईतील जनतेला केवळ शब्दांची नव्हे तर ठोस विकासाची गरज आहे. हा विश्वासार्ह आणि परिणामकारक विकास भाजपा महायुती व मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या सक्षम नेतृत्वाखालीच शक्य आहे, असा ठाम विश्वास मी व्यक्त केला. याच अनुषंगाने येत्या १५ जानेवारी रोजी कमळासमोरील बटन दाबून भाजपा महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन मी उपस्थित नागरिकांना केले.या जाहीर सभेस मा. खासदार श्री. किरीट सोमय्या जी, जिल्हा महामंत्री भावेश भानुशाली, उपाध्यक्ष विकास कामत, रवी पूज, आर.पी.आय. (आठवले गट) चे श्रीधर साळवे, मंडळ अध्यक्ष विशाल पूज, रचित त्रिवेदी, महामंत्री दिलीप लिलानी, राजू बर्गे, संजय दरेकर, वॉर्ड अध्यक्ष अनुज शाह, सचिन भोसले, महिला वॉर्ड अध्यक्ष गीता जाधव, नीलम गोलेचा तसेच महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.घाटकोपरचा विकास, मुंबईचा विश्वास- भाजपा महायुतीचाच!

Leave a Reply

Open chat
Powered by