व्यक्तिगत
गुजराती जैन असल्याने आणि वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर, पराग शाह जी यांनी १९९१ साली कौटुंबिक बांधकाम व्यवसायात सामिल होऊन आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. सन २००२ मध्ये त्यांनी आपल्या क्षमतेच्या, व्यवसाय कौशल्याच्या तसेच उद्योजकीय अनुभवाच्या बळावर मॅन इन्फ्राकंन्स्ट्रक्शन लिमिटेडची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली २०१० या वर्षी कंपनी सुचीबद्ध झाली. बांधकाम उद्योगात पराग शाह जी यांना जवळपास २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत हजाराहून जास्त व्यक्तींसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
पराग शाह परोपकारी आहेत आणि जैन भिक्षु गुरुदेव श्री परमपूज्य नम्रमुनी म.सा. जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचा आशीर्वाद सदैव पाठीशी असल्याने ते मानवतावादी कार्यांचे कटाक्षाने समर्थन करतात. आणि समाजसेवेसाठी सदैव प्रयत्नशील असतात. त्यांनी बऱ्याच सामाजिक, धर्मादाय, धार्मिक तसेच प्राणी संघटन संस्था आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. समाजातील दुर्बल घटक लक्षात घेता त्यांच्या उन्नतीच्या दृष्टीने हेल्थ केअरला चालना देण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी लायन्स क्लब ऑफ घाटकोपर, गरोडिया नगर येथील कम्युनिटी हॉलमध्ये वैद्यकीय केंद्र उघडण्यास तसेच डायलिसिसची तरतुदीची स्थापना करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. प्राण्यांविषयी त्यांना प्रेम असल्याने त्यांनी जनावरांवर होणाऱ्या क्रौर्याविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे. एवढेच नव्हे तर जनावरांसाठी आश्रय, चारा आणि औषधे पुरवणाऱ्या गौशाळांना आर्थिक साहाय्य करून पशु कल्याणाला चालना दिली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहित करण्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असतो. तसेच त्यांनी गरीब मुलांना आणि दिव्यांग मुलांनासुद्धा खास शिक्षणासाठी आर्थिक मदत करून प्रोत्साहित केले आहे. पराग शाह जी पारसधाम, श्री उवासाग्गहार साधना ट्रस्ट, प्राणेश्वर महादेव ट्रस्ट, श्री कामागाली वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, जेटपूर येथील श्री तपस्विजी माणिकचंद जी ट्रस्ट आणि अन्य स्वयंसेवी संस्थांचे विश्वस्त आहेत. ते श्री ग्रेटर बॉम्बे वर्धमान स्थानकवासी जैन महासंघाचे अध्यक्ष आहेत.
मोठ्या स्तरावर समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने पराग शाह जी यांनी राजकारणात प्रवेश केला. आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीमध्ये घाटकोपर पूर्व , प्रभाग क्रमांक १३२ येथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर लगेचच त्यांनी स्वयंसेवकांची एक तुकडी तयार केली तसेच घाटकोपरच्या विकासासाठी व विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी अभियंता, डॉक्टर, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट्स क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करून सक्रिय पुढाकार घेतला. पराग शाह जी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे एक समर्पित पथक प्रभाग क्रमांक १३२ मध्ये बीएमसी, वाहतूक पोलीस, आरटीओ, रेल्वे इत्यादी विभागांमध्ये पुढाकार घेऊन काम करण्यासाठी तैनात झाले. ते नगरसेवक म्हणून निवडून येताच त्यांनी सर्व जाती आणि समुदायातल्या लोकांच्या तातडीच्या गरजांसाठी विनाशुल्क रुग्णवाहिनी तैनात केली. पराग शाह जी यांनी आरटीओ व रहदारी विभागातील वाहतुकीच्या नियमित व्यवस्थापनासाठी आणि सुरळीत चालणाऱ्या वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या काही महत्वाच्या ठिकाणी डिव्हायडर्स, ट्रॅफिक सिग्नल्स आणि ट्रॅफिक वॉर्डन्स ( जे त्यांच्या पगारावर आहेत ) तैनात केले आहेत. एवढेच नाही तर त्यांनी घाटकोपर येथील रहिवाश्यांच्या सोयीसाठी ७०४५६७१००८ हा व्हाट्सएप क्रमांक लाँच केला आहे जेणेकरून रहिवाशांच्या काही तक्रारी किंवा अडचणी असतील तर ते नंबर वर मेसेज करू शकतात. म्हणजे टीम मधली माणसे या तक्रारींचे निराकरण करू शकतील. अत्तापर्यंत पराग शाहजींच्या नेतृत्वाखाली टीम ने ९९ टक्के तक्रारींचे निराकरण केल्याचा यशस्वी रेकॉर्ड आहे. गरोडिया नगरचे रस्ते जे अनेक वर्षांपासून तसेच पडले होते त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पराग शाह जी यांनी स्वतःहून पुढाकार घेतला जे यावर्षी काँक्रिटीकरणाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. यामुळे मुख्यतः जलसंचय रोखण्यास मदत झाली, वाहतुकीची सुरक्षित सुलभता सुनिश्चित झाली आणि गरोडिया नगर मधील शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी आणि रहिवाश्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देता आला. इतकेच नव्हे तर पराग शाह जी यांनी प्रभाग क्रमांक १३२ मधील बागांचे सुशोभीकरण, रस्त्यांवर ठिकठिकाणी एलईडी बल्ब, सुरळीत मार्ग तयार करणे, बागेमध्ये बेंच बसवण्यापासून ते ९००० पेक्षा जास्त झाडे लावण्यात प्रामुख्याने पुढाकार घेतला.
पराग शाह हे घाटकोपर मधील श्री रामजी आशर विद्यालय हायस्कुलचे विश्वस्त आहेत. याच शाळेत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यासाठी इमारत बांधण्यात पुढाकार घेतला. पुलवामा येथे झालेल्या भीषण हल्ल्यानंतर पराग शाह जी यांनी सैन्यदलाकरता निधी गोळा करण्यासाठी मोहीम राबवली. आणि नागरिकांकडून जवळपास ४० लाख रुपयांचा निधी जमा केला. आणि घाटकोपर विभागाच्या वतीने ४० लाख रुपयांच्या सन्माननीय योगदानाने संग्रहात प्रथम स्थान पटकावले. तसेच सैन्य दलासाठी स्वतःहुन आर्थिक मदत म्हणून स्वखर्चाने ८० लाख रुपयांचा निधी दिला. महाराष्ट्रात नुकत्याच आलेल्या दुदैवी पुरामुळे सांगली तसेच कोल्हापूर मधल्या बऱ्याच लोकांचे हाल झाले. काही जण बेघरसुद्धा झाले. तेव्हा पराग शाह जी यांनी मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीला २५ लाख रुपयांचा धनादेश देऊन हातभार लावला आणि नागरिकांकडूनही जवळपास १८ लाख रुपयांचा नाही निधी गोळा केला. याव्यतिरिक्त औषधे, पाकडे, भांडी इत्यादी पूरसामग्री पुरवली.
पराग शाह यांनी अलीकडेच त्यांच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आपले पद सोडून आपल्या विविध धार्मिक,सामाजिक आणि राजकीय कार्यांसाठी संपूर्ण लक्ष केंद्रित केले.
आमचे व्हिजन
- झोपडपट्टी असलेल्या क्षेत्रांचा विकास करणे
- मागासवर्गीयांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे
- दिव्यांग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम आयोजित करणे
- लोकांना एकत्रित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले
- कमकुवत विभागाचे सशक्तीकरण करणे
- लोकांना सरकारी धोरणांविषयी तसेच नियम व कायद्यांविषयी जागरूक करणे
- नैसर्गिक आपत्त्तीमुळे नुकसान झालेल्या लोकांना मदत करणे
- आरोग्य सेवेला प्रोत्साहन देणे