मुंबई उपनगर आमदारांची चेतना कॉलेजमध्ये पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक
1
May
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान!
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज घाटकोपर पूर्व येथील पंतनगर मध्ये ‘शिवराज क्रीडा मंडळ’ आयोजित ४० व्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये नगरसेविका राखीताई जाधव यांच्यासह सहभागी झालो. सलग ४० वर्षे हा समाजसेवेचा यज्ञ सुरू ठेवल्याबद्दल मी मंडळाच्या सर्व सदस्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो.रक्तदान हे केवळ कर्तव्य नसून ते माणुसकीचे दर्शन घडवणारे महान कार्य आहे. आजच्या या विशेष दिनी अनेक तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. अशा विधायक उपक्रमांमुळेच आपल्या समाजाची जडणघडण अधिक मजबूत होत आहे.याप्रसंगी उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला आणि या प्रेरणादायी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.जय महाराष्ट्र! जय हिंद!








