‘शाळेचा पहिला दिवस – प्रवेशोत्सव’ सोहळ्यात उत्साही सहभाग

Posted by admin
Category:

शाळेचा पहिला दिवस… नवा उत्साह, नवी स्वप्ने! विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत अविस्मरणीय आणि आनंदाच्या क्षणात म्हणजेच ‘शाळेचा पहिला दिवस – प्रवेशोत्सव’ सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला.मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदरणीय कॅबिनेट मंत्री मा. अ‍ॅड. आशिष शेलार जी आणि मुंबईच्या आदरणीय महापौर श्रीमती रितूताई तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते, तसेच कार्यसम्राट नगरसेविका व स्थायी समिती सदस्य श्रीमती राखीताई जाधव यांच्या माध्यमातून घाटकोपर पूर्व येथील म. न. पा. शाळा क्र. ३ (पंतनगर पोलिस स्टेशन जवळ) येथे हा सुंदर सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. नव्या शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या सर्व चिमुरड्या विद्यार्थ्यांचे प्रेमादराने स्वागत करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. दीपक दळवी जी,महामंत्री भावेश भानुशाली,अशोक राय,पंतनगर वाधवा मंडळाचे अध्यक्ष श्री. रचितकुमार त्रिवेदी, महामंत्री श्री. संजय (बाबू) दरेकर, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. अनु खत्री तसेच वॉर्ड क्र. १३१ चे अध्यक्ष श्री. सचिन विष्णू भोसले आणि महिला मोर्चा अध्यक्ष श्रीमती गीता अविनाश जाधव, विना लाड,अनिता अतितकर, तुषार कांबळे, राणा सिंग यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिक्षक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by