रामजी आशेर विद्यालयात ‘विद्यार्थी प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्य वितरण’ सोहळा संपन्न

Posted by admin
Category:

आज दिनांक १५ जून २०२६ रोजी “ज्ञान, संस्कार, शिस्त आणि प्रगती” या मूल्यांच्या जोरावर ११५ वर्षांचा दैदिप्यमान इतिहास लाभलेल्या रामजी आशेर विद्यालय वाडी ट्रस्ट संचलित ‘रामजी आशेर विद्यालय हायस्कूल आणि एच. व्ही. के. तन्ना कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय’ येथे आयोजित ‘विद्यार्थी प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्य वितरण समारंभा’त सहभागीझालो तसेच, नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सर्व लाडक्या विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.याप्रसंगी माझ्यासोबत मुंबईच्या महापौर माननीय श्रीमती रितू तावडे जी, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी जी, जिल्हा उपाध्यक्ष श्री. विकास कामत जी, मंडळ महामंत्री श्री. विद्युत काजी जी यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नव्या शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या सर्व गुणवंत चिमुरड्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Open chat
Powered by