भाजपा जनसंपर्क कार्यालयात उत्साहात पार पडला भव्य ध्वजारोहण सोहळा
राष्ट्राभिमानाचा उत्सव… तिरंग्याला सन्मानाची मानवंदना!
स्वातंत्र्य दिनाच्या गौरवशाली पर्वानिमित्त आज भाजपा जनसंपर्क कार्यालय, आनंदजी लेन, घाटकोपर पूर्व येथे देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात उपस्थितीत भव्य ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी नगरसेविका राखीताई जाधव, नगरसेवक प्रवीण छेडा, नगरसेवक धर्मेश गिरी, मा. विनायक कामत, मा. भालचंद्र शिरसाट, मा. भावेश भानुशाली यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रध्वजाला अभिमानाने मानवंदना देत उपस्थितांनी देशाची एकता, अखंडता आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाला.
तिरंग्याचा सन्मान… राष्ट्रसेवेचा संकल्प!भारत माता की जय! वंदे मातरम्! जय हिंद!












