स्वातंत्र्यदिनी राष्ट्रसंत नम्रमुनी महाराजांच्या उपस्थितीत ‘लहरा दो’ कार्यक्रम
16
Aug
‘लहरा दो – स्वांतत्र्य दिन विशेष संध्या’
परम नम्रमुनी गुरुदेवांच्या पावन आणि दिव्य उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘लहरा दो’ या देशभक्तीपर व भक्तीमय कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभले.याप्रसंगी सी. ए. देवांश दोशी आणि हर्षित शाह यांनी सादर केलेल्या सुंदर भक्तीगीतांनी संपूर्ण वातावरण देशभक्ती आणि श्रद्धेने न्हाऊन निघाले होते. या दिव्य सोहळ्यातून राष्ट्रप्रेम आणि एकतेचा एक अद्भुत संदेश प्रत्येकाच्या मनात रुजला.परम नम्रमुनी गुरुदेवांचे मंगल आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहोत, हीच प्रार्थना!



