ईशान्य मुंबई भाजपची विशेष संघटनात्मक बैठक संपन्न
भारतीय जनता पार्टी, ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने आयोजित विशेष संघटनात्मक बैठकीस प्रमुख उपस्थिती लावली.या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते, मा. खासदार श्री. Kirit Somaiya जी यांनी आगामी काळातील संघटनात्मक वाटचाल, पक्षविस्तार, कार्यकर्त्यांची सक्रिय भूमिका आणि भविष्यातील कार्याची दिशा याविषयी अत्यंत मोलाचे व सविस्तर मार्गदर्शन केले.बैठकीस मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, भाजप ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. दीपक दळवी जी, जिल्हा महामंत्री श्री. भावेश भानुशाली, जिल्हा उपाध्यक्ष श्री. विकास कामत जी, भाजप SIR प्रदेश कार्यालय संयोजक श्री. विनायक कामत जी, नगरसेविका राखीताई जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.तसेच घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द– शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातील महिला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष संघटन अधिक मजबूत करत आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि पक्षाचे ध्येयधोरण जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.






