रमाबाई आंबेडकर नगरात सांस्कृतिक ‘दिपावली संध्या’ सोहळा
20
Oct
आज माझ्या मतदारसंघातील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्र.१२५ आणि शांतीसागर मित्र मंडळ (रजि.) कला क्रीडा आयोजित सांस्कृतिक दिपावली संध्या सोहळ्यास प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित राहिलो. गाणसम्राट श्री. चंद्रकांत शिंदे निर्मित हिंदी मराठी गीत-संगीताच्या सुरेल कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद दिला. यावेळी मी कलाकारांचे कौतुक केले आणि सर्व उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नेटके आयोजन केल्याबद्दल वॉर्ड अध्यक्ष संघदीप केदारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे देखील कौतुक केले. यावेळी भालचंद्र शिरसाट जी(माजी नगरसेवक तसेच प्रवक्ता भा.ज.पा.), मुकुंद काकड जी (मंडल उपाध्यक्ष भा.ज.पा.) घाटकोपर पूर्वचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, स्थानिक रहिवाशी मोठया संख्येने उपस्थित होते.






