“पावसाळ्यापूर्वीच्या तयारीच्या अनुषंगाने आनंदजी लेन व रामजी आशर येथील रस्त्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली”
10
May
आज महापालिका अधिकाऱ्यांसह माझ्या मतदारसंघातील आनंदजी लेन व रामजी आशर येथील रस्त्यांची पाहणी केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका उपायुक्त श्री संतोष धोंडे व सहाय्यक आयुक्त श्री गजानन बेलाले आणि रस्ते विभागाशी संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन घाटकोपरमधील सर्व रस्त्यांच्या कामाबाबत या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व सुचना दिल्या. तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचा आग्रह धरत तसे निर्देश दिले.








