घाटकोपर मधील विविध समस्यांबाबत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांसह आयोजित बैठकीत उपस्थित

Posted by admin
Category:

आज बृहन्मुंबई महानगरपालिका एन विभाग येथे घाटकोपर मधील विविध समस्यांबाबत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सहभागी झालो. या बैठकीत मेट्रोचे थांबलेले काम, अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत पार्किंग, अनधिकृत रिक्षावाले, घाटकोपर मधले ट्राफिक, विकासकामार्फत गिळंकृत केलेला फूटपाथ, रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या असलेल्या गाड्या, मेट्रोच्या कामामुळे बाधित होणारे रस्ते, गिगा वाडी येथील जीर्ण झालेली नाल्याची भिंत व तेथील रहिवाशांना कमी दाबाने येणारे पाणी, AGLR चे संथ गतीने सुरू असलेले काम, अनधिकृतपणे उभ्या केलेल्या गाई, गौरीशंकर वाडी येथील नाट्यगृह असे विषय मांडण्यात आले. या विषयाला अनुसरून सर्व अधिकाऱ्यांना जाब विचारून संबंधित विषय तात्काळ मार्गी लावावे याबाबत आदेश पारित केले. यावेळी श्री रवी पुज, श्री विकास कामत, श्री भालचंद शिरसाट, श्रीमती बिंदुबेन त्रिवेदी, सर्व वॉर्ड अध्यक्ष, महानगरपालिका एन विभागाचे सर्व अधिकारी, एम एम आर डी ए मेट्रो विभागाचे अधिकारी, चेंबूर व विक्रोळी विभागाचे ट्राफिक पोलीस अधिकारी, घाटकोपर मधील विविध विकासक उपस्थित होते.

#Ghatkopar #BMCMeeting #MetroDevelopment #TrafficIssues #IllegalVendors #MumbaiIssues #AGLRWork #InfrastructureChallenges

Leave a Reply

Open chat
Powered by