शहीद कै. मुरली नाईक यांच्या कुटुंबाला कृतज्ञता निधी प्रदान – घाटकोपरकरांचा अभूतपूर्व सहभाग
भाजपाचे कामराज नगरमधील जुने-जाणते कार्यकर्ते श्री. श्रीराम नाईक जी यांचे चिरंजीव शहीद वीर जवान कै. मुरली नाईक यांना ऑपरेशन सिंदूर दरम्यान आतंकवाद्यांशी लढताना वीरमरण आले.
स्वतः शेतमजूर असणाऱ्या नाईक दाम्पत्याने ज्येष्ठ मुलाला या देशासाठी अर्पण केले. त्यामुळे समाज म्हणून या नाईक कुटुंबाला मदत करण्याचे मी आवाहन केले होते.
त्याला घाटकोपरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. एकूण ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी जमा झाला असून हा शहीद जवान कै. मुरली नाईक यांच्या बलिदानाला नमन करत हा कृतज्ञता निधी श्री. श्रीराम नाईक जी व त्त्यांच्या पत्नी आणि वीरमाता श्रीमती ज्योतिबाई नाईक यांना कामराज नगर, घाटकोपर पूर्व येथील श्री देवी मुत्तु मारी अम्मा मंदिरात झालेल्या कार्यक्रमात माझ्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी शहीद कै. मुरली नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.
नाईक कुटुंबियांच्या पाठीशी मी सैदव उभा राहणार असून कोणतीही गरज भासल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असा शब्द यावेळी बोलताना मी दिला. तसेच माझ्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल घाटकोपरवासियांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमास देशप्रेमी घाटकोपरकरांनी प्रचंड गर्दी केली होती.
शहीद वीर जवान कै. मुरली नाईक अमर रहे…!
जय हिंद..!






