विद्याविहार (पश्चिम) येथील श्री गावदेवी अंबिका, श्री आदिनाथेश्वर व श्री महागणपती मंदिर महोत्सवात सहभाग
16
May
आज विद्याविहार (पश्चिम) येथील श्री गावदेवी अंबिका, श्री आदिनाथेश्वर व श्री महागणपती मंदिराच्या वार्षिक महोत्सवात उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले. या पुरातन व ऐतिहासिक देवस्थानात अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने दरवर्षी सहभागी होत असतात.
यंदाचाही महोत्सव भक्तिभाव, पारंपरिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला होता. यावेळी मंदिरातील विविध धार्मिक विधींमध्ये सहभाग घेत भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.
मंदिर ट्रस्ट सदस्य, स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत हा महोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.








