“वचनपूर्तीची अवर्णीय अनुभूती “
वचनपूर्तीचा सोहळा
माझ्या घाटकोपर पूर्व मतदारसंघातील माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर मधील नागरिकांना त्यांच्या हक्काची 7 पक्की घरे देण्याचे आश्वासन मागील विधानसभा निवडणूकीदरम्यान दिले होते. इथल्या रहिवाश्यांना अभावग्रस्त झोपडीतून सोयी सुविधांनी युक्त इमारतीत नेण्याचा शब्द दिला होता. दिलेला शब्द मी पाळला असून माझ्या झोपडपट्टीतील या बांधवाचे स्वतःच्या हक्काच्या पक्क्या घराचे स्वप्न पूर्णत्वास आता जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगरचा पुनर्विकास होत असून 16,575 झोपडपट्टी धारकांना इमारतीमध्ये सदनिका मिळणार आहेत. याचा पहिला टप्पा म्हणून प्रत्येक झोपडीधारकाला त्याचा भाड्याचा धनादेश डिमार्ट जवळ, कामराज नगर येथे आयोजित भव्य सोहळ्यात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेबांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास माझ्यासह सामाजिक न्याय आणि अधिकारिता केंद्रीय राज्य मंत्री मा. श्री. रामदास आठवले जी, शिक्षणमंत्री मा. श्री दीपक वसंत केसरकर जी, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मा. श्री. मनोज कोटक जी, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा. श्री. अतुल सावे जी आदी मान्यवर उपस्थित होते.
हे श्रेय केवळ माझे नसून माझे मार्गदर्शक आणि मा. उपमुख्यंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या पाठिंब्यामुळे, मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्यामुळे तसेच वरील सर्व मान्यवरांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झाले आहे. श्री. परमेश्वर कदम, श्री रतनम देवेंद्र यांच्या अथक प्रयत्नांमुळे माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगरची पुढची पिढी एका पक्क्या घरात राहू शकेल. या दोघांची या कामासाठी मला साथ मिळाली. रमाबाई नगर आणि कामराज नगर मधील मायभगिनींच्या, बांधवांच्या चेहऱ्यावरील सुख आणि समाधान पाहून मला अवीट आनंद झाला आहे. वचनपूर्तीची ही अनुभूती अवर्णीय आहे.
#वचनपूर्तीचा_सोहळा #GhatkoparEast #paragshah