माझयातर्फे घाटकोपर पूर्व येथील महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागातील सहाय्यक आयुक्तांसह बैठकीचे आयोजन
25
Sep
आज घाटकोपर पूर्व येथील महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागात सहाय्यक आयुक्त श्री गजानन बेल्लाळे व श्री संजय सोनवणे यांच्यासोबत विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह मी बैठक घेतली. या बैठकीत घाटकोपर पूर्वमधील वल्लभबाग लेन, ६० फुटी रोड, गरोडिया नगरमधील विविध खाजगी रोड मनपा कडे हस्तांतरण करून त्याचा विकास करण्याबद्दल, ओडियन जलतरण तलावाचे लवकरात-लवकर काम सुरू करण्याविषयी व विद्याविहार पूर्व-पश्चिम रेल्वे उड्डाणपूल कामाबाबत तसेच इतर विविध विषयांबाबत सखोल चर्चा केली व सर्व विषय तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन मनपा अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी माझ्यासह श्री भालचंद्र शिरसाट, श्री विकास कामत, श्री रवी पुज, श्री दिलीप लिलानी, श्री देवेन चितालिया, श्री उमेश वर्मा, श्रीमती नीलम दंती आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
#GhatkoparEast #ParagShah



