महाराष्ट्र विधानमंडळाच्या आश्वासन समितीच्या दुसऱ्या बैठकीत सक्रिय सहभाग
28
May
आज महाराष्ट्र विधानमंडळाच्या #आश्वासनसमिती च्या दुसऱ्या बैठकीस उपस्थित राहून समितीच्या कामकाजात सहभागी झालो. या बैठकीत विधीमंडळाच्या पटलावर सरकारच्यावतीने सन्माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तसेच त्या अनुशंगाने साधक-बाधक चर्चा करून या आश्वासनांमध्ये आवश्यक दुरुस्ती आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.
महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आश्वासन समितीचा सदस्य या नात्याने मी अभ्यासपूर्ण व जागरूकपणे या बैठकांत सहभागी होत आहे.




