पालकमंत्री आशिष शेलार यांच्यासोबत एम. पी. वैद्य मार्ग – टिळक रोड जंक्शन रस्त्यांची पाहणी व समस्या आढावा

Posted by admin
Category:

आज मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार जी यांच्यासोबत एन वॉर्डमधील एम. पी. वैद्य मार्ग – टिळक रोड जंक्शन येथील रस्त्याची पाहणी करून नागरिकांना होणाऱ्या वाहतूक आणि रस्त्यांशी संबंधित अडचणींचा आढावा घेतला.
या दौऱ्यात रस्त्यांची सद्यस्थिती, ड्रेनेज व्यवस्था, तसेच पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांसाठी सुसज्ज आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
माझ्या मतदारसंघातील नागरी सुविधा उभारणीसाठी आणि समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Open chat
Powered by