छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट – घाटकोपरमध्ये आनंदोत्सव

Posted by admin
Category:

🚩जय भवानी जय शिवराय🚩
आज माझ्या मार्गदर्शनाखाली खलई गावदेवी अंबिका मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला.
या विशेष निमित्ताने शिव आरतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात उपस्थित राहून शिवप्रेमी नागरिकांशी संवाद साधला आणि महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान व्यक्त केला. भक्तीमय वातावरणात आरतीने सुरेल शेवट झाला.
कार्यक्रमात सर्व पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by