घाटकोपर पूर्व येथे वॉर्ड क्र 131 मध्ये जनता दरबाराचे आयोजन
जनहित सर्वोपरि!!
आज वॉर्ड क्र 131 मध्ये समर्थ सेवा संघ कार्यालय, संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर, घाटकोपर पूर्व येथे जनता दरबार आयोजित केला होता. या दरबारात नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा विश्वास दिला तसेच काही समस्यातर तात्काळ उपाय म्हणून संबंधित व्यक्तीला सांगून अथवा फोन करून त्या सोडवल्या. तसेच वरिष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप केले. यावेळी श्री. अशोक राय, श्री रवी पूज, श्री विकास कामत, श्री अजय बागल, कॅप्टन स्वामीनाथन, श्री संजय दरेकर, श्रीमती अनिता अतीतकर, श्रीमती वीणा लाड, श्री सुनील शृंगारे, श्री देवेन चीतलीया, ॲड नवल शर्मा, श्री गणेश चाळके मान्यवरांसह असंख्य स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
#PublicService #JanataDarbar #CitizenEngagement #AayushmanBharatCard #PublicWelfare #ProblemSolving #GhatkoparEast #SevaBhaviparagShah2_0