घाटकोपर पूर्वमध्ये संयुक्त जयंती उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून सहभाग — विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप आणि रामदास आठवले यांची सदिच्छा भेट
30
May
आज दिनांक 30 मे 2025 रोजी पंचशील मित्र मंडळ, गंधकुटी संकल्प समिती, माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व आयोजित तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न, परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रमास प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित राहिलो. यावेळी माझ्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले, कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मा. श्री. रामदास जी आठवले यांची ही सदिच्छा भेट झाली.
सदर कार्यक्रमास माझ्यासोबत भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












