घाटकोपरमध्ये मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान उपक्रम
✨ वाढदिवस महाराष्ट्र सेवकाचा, संकल्प महारक्तदानाचा! ✨
📍 २२ जुलै २०२५ | घाटकोपर पश्चिम, शिवाजी हॉल, कामा लेन
🩸 रक्तदान — मानवतेचं सर्वोच्च रूप!
आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त, घाटकोपर पश्चिम येथे आयोजित ‘महारक्तदान अभियान’ या विशेष उपक्रमात सहभागी होण्याचा मान मला मिळाला. याच उपक्रमाअंतर्गत ‘शालेय वह्या वाटप’ कार्यक्रमामध्येही सहभागी होण्याची संधी लाभली, शिक्षण आणि जीवन वाचविण्याची ही दुहेरी प्रेरणा समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी ठरली.
या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याच्या चेहऱ्यावर समाजासाठी काही मोलाचं देण्याचं समाधान स्पष्ट दिसत होतं. त्यांच्यातील सेवाभाव, निःस्वार्थ योगदान आणि सामाजिक बांधिलकी मनाला स्पर्शून गेली.
मा. देवेंद्रजींच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन हेच त्यांच्या दूरदृष्टीचा आणि कार्यक्षमतेचा ठसा आहे.
यावेळी सर्वांनी देवेंद्रजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.











