“अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार “
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कन्नमवार नगर, विक्रोळी येथे ईशान्य मुंबई लोकसभा महायुतीचे भाजपा उमेदवार मा. श्री. मिहिर कोटेचा यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस मी उपस्थित राहिलो. सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपस्थित मतदार बंधू-भगिनींना मोदीजींचे 400 पारचे लक्ष्य पार करण्यासाठी कमळाच्या बटनावर मतदान करून श्री. मिहिर कोटेचा यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी माझ्यासह खासदार मा. श्री. किरीट सोमय्या, आमदार श्री. राम कदम, आमदार श्रीमती डॉ. मनीषा कायंदे ताई, श्री. शिरीष सावंत, श्री. अविनाश महातेकर आणि महायुतीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



