विधानमंडळ समित्यांच्या एकत्रित उद्घाटन सोहळ्यास आश्वासन समिती सदस्य म्हणून उपस्थिती

Posted by admin
Category:

महाराष्ट्र शासनाच्या कार्यकारी प्रशासनाच्या संपूर्ण प्रशासन व्यवस्थेवर सखोल, संपूर्ण प्रभावी व अर्थपूर्ण (Effective and meaningful) नियंत्रण व देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने विधानमंडळ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानमंडळांच्या या सर्व समित्यांचा एकत्रित उद्घाटन सोहळा आज विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहात संपन्न झाला. आश्वासन समितीचा सदस्य या नात्याने मी या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष मा. श्री Rahul Narwekar – राहुल नार्वेकर जी, विधान परिषद सभापती मा. श्री Ram Shinde जी, वि.स. उपाध्यक्ष मा. श्री अण्णा बनसोडे जी, वि.प. उपसभापती मा. श्रीमती Dr. Neelam Gorhe जी, आदरणीय मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी, उपमुख्यमंत्री मा. श्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे जी, ज्येष्ठ वि.स सदस्य, माजी मंत्री मा. श्री Vijay Wadettiwar जी व विधीमंडळातील सन्माननीय अधिकारी वर्ग उपस्थित होता. तसेच सभागृहात विविध समित्यांचे समिती प्रमुख तसेच सदस्य, मंत्रीगण आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील मान्यवर आमदार उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by