विकसित भारताच्या अमृतकालातील 11 वर्षांचा प्रवास – संकल्प सभेत सविस्तर मांडणी
विकसित भारताचा अमृतकाल – सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्षे
भारतीय जनता पार्टी पंतनगर-वाधवा मंडळ आयोजित “संकल्प सभा” कार्यक्रम शुक्रवार, दिनांक 20 जून 2025 रोजी ब्राह्मण समाज हॉल, जोशी लेन, घाटकोपर (पूर्व) येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला उपस्थिती लावून, गेल्या 11 वर्षांत केंद्र सरकारच्या माध्यमातून जनकल्याणासाठी करण्यात आलेल्या कामांची सविस्तर माहिती कार्यकर्ते व नागरिकांना दिली. तसेच, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांवर आधारित योजनांचे महत्त्व देखील अधोरेखित केले.
या संकल्प सभेला भाजपा घाटकोपर (पूर्व) विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेमध्ये देशाच्या विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या संकल्पांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले, तसेच आगामी काळात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.







