रामजी आशर शाळेतील स्नेहमेळावा – आठवणींचा, आपुलकीचा आणि ऋणानुबंधांचा दिवस
जिथून सुरुवात झाली
काल ३१ मे २०२५ हा दिवस माझ्यासाठी अतिशय भावुक आणि आनंददायी ठरला. माझ्या लाडक्या रामजी आशर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अनुभवायला मिळाला ही केवळ आठवणींची नाही तर आपुलकी, प्रेम आणि शाळेविषयीच्या ऋणानुबंधांची एक सुंदर भेट होती.
मी स्वतः या शाळेचा विद्यार्थी होतो आणि आज या शाळेचा विश्वस्त म्हणून काम करत आहे, हे माझ्यासाठी गौरवाचं आणि भाग्याचं आहे. १९५७ पासूनचे ज्येष्ठ विद्यार्थी, आमचे आदरणीय शिक्षक, आणि विविध पिढ्यांतील मित्रमंडळी पुन्हा एकत्र भेटल्यावर मनात प्रचंड आनंद दाटून आला.
वर्षानुवर्षांनी एकमेकांना भेटताना अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहताना दिसले. काही आठवणी हसवून गेल्या, तर काही गहिवरून गेल्या. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात आजही आमच्या बालपणाचे आवाज घुमताना वाटले.
माझं जीवन घडवण्यात या शाळेचा सिंहाचा वाटा आहे. आजही मी हीच भावना जपतो आणि या संस्थेचं ऋण फेडण्यासाठी कार्यरत आहे. अशा कार्यक्रमांनी आमच्यातील बंध अधिक दृढ होतात आणि शाळेच्या वाटचालीत नवीन उभारी येते.
जहां से सफर शुरू हुआ
31 मई 2025 का दिन मेरे जीवन के सबसे भावुक और खास पलों में से एक रहा। अपने जीवन की नींव जिस रामजी आशर स्कूल में पड़ी, वहीं आज बतौर पूर्व छात्र और ट्रस्टी फिर से जुड़ने का अवसर मिला – यह मेरे लिए गर्व और आनंद का विषय है।
1957 से लेकर आज तक के छात्र, हमारे सम्माननीय शिक्षक और अनेक साथियों को एक ही मंच पर देखकर मन भर आया। वर्षों बाद जब हम सब एक-दूसरे से मिले, तो सिर्फ चेहरे ही नहीं, दिल भी जुड़ गए।
कुछ साथी इतने वर्षों बाद मिले कि आँखें नम हो गईं। स्कूल की गलियाँ, कक्षाएँ, मैदान – हर कोने में आज भी बचपन की यादें ताज्या हो गईं।
मैं सौभाग्यशाली हूँ कि मुझे इस विद्यालय का छात्र होने का गौरव प्राप्त हुआ, और आज भी मैं एक ट्रस्टी के रूप में इस संस्था से सेवा भावपूर्वक जुड़ा हूँ। ऐसे स्नेह मिलन हमें हमारी जड़ों से जोड़े रखते हैं और भावी पिढ़ियों के लिए प्रेरणा बनते हैं।
My School, My Soul
May 31, 2025, will forever hold a special place in my heart. Returning to Ramji Asar School – not as a guest, but as a former student and now a trustee – was a deeply emotional and proud moment for me.
Meeting batchmates from decades ago, dating back to 1957, along with our beloved teachers and friends from various generations, was a surreal experience. It was more than just a reunion – it was a revival of memories, emotions, and our shared journey.
Many of us met after years, some even after decades. There were tears of joy, heartfelt hugs, and endless stories that brought back our school days in the most vivid way.
This school has been instrumental in shaping who I am today. As someone who now has the opportunity to serve this institution, I feel blessed to give back in whatever way I can.
Reunions like this remind us of our roots, reconnect our spirits, and strengthen the legacy we share as Ramji Asar alumni. Here’s to many more such moments of unity and gratitude.












