मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पण ब्लड बँकेत महारक्तदान उपक्रम
22
Jul
🪷 जीवेत शरद: शतम् 🪷
📍 २२ जुलै २०२५ | समर्पण ब्लड बँक, नायडू कॉलोनी, घाटकोपर पूर्व
राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपर पूर्व येथील समर्पण ब्लड बँक, नायडू कॉलोनी येथे आयोजित ‘महारक्तदान अभियान’ या उपक्रमाने समाजसेवेचा नवा आदर्श प्रस्थापित केला.
रक्तदात्यांचा निःस्वार्थ सेवाभाव, चेहऱ्यावरचं समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मनाला भारावून टाकणारी होती. या उपक्रमात सहभागी प्रत्येक रक्तदात्याचे मनःपूर्वक आभार मानतो.
देवेंद्रजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा… त्यांच्या नेतृत्वाखाली अशी समाजोपयोगी चळवळ अधिक बळकट होवो, हीच सदिच्छा.






