जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ घाटकोपर पश्चिम येथे नियो वेलकम हॉटेलजवळ आंदोलनात झालो सहभागी

Posted by admin
Category:

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज घाटकोपर पश्चिम येथील नियो वेलकम हॉटेलजवळ जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मी स्वतः सहभागी होऊन दहशतवादी प्रवृत्तींविरोधात आवाज उठवला.
अशा हल्ल्यांनी भारताची शांतता खंडित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता कठोर आणि निर्णायक उत्तर देणे अत्यावश्यक असल्याच्या क्रोधित जनतेच्या भावना व्यक्त करत केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली तसेच शहीद झालेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी भाजपा नेते आणि माजी खासदार श्री @kirit.somaiya जी उपस्थित होते. त्याच बरोबर घाटकोपर पूर्व आणि पश्चिम विधानसभेतील भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Open chat
Powered by