घाटकोपर (पूर्व) – बूथ प्रमुखांसाठी छत्री वाटप आणि संघटनात्मक बैठक यशस्वीरीत्या पार पडली
12
Jul
आज संध्याकाळी गंधकुटी विहार, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पूर्व) येथे बूथ प्रमुखांसाठी आयोजित छत्री वाटपाचा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला.
शिस्तबद्ध आयोजन, कार्यकर्त्यांची उस्फूर्त उपस्थिती आणि एकमेकांतील समन्वय यामुळे कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी ठरले.
छत्री वाटपानंतर लगेचच सर्व बूथ प्रमुखांची नियोजित बैठक घेतली. या बैठकीत आगामी संघटनात्मक दिशा, लोकसहभाग वाढवण्याच्या रणनीती आणि प्रभागातील विविध प्रश्नांवरील उपाययोजना यावर सखोल चर्चा केली. या वेळी अर्पिता शेलार: मंडल अध्यक्ष — वाॅड : १२५/१३३, संघदीप मनोहर केदारे: अध्यक्ष – वॉर्ड क्र. १२५, शशिकांत घोडके: महामंत्री वॉर्ड क्र. १२५, वैभव पाचपुते: महामंत्री वॉर्ड क्र. १२५, सविताताई कापसे: महिला वॉर्ड अध्यक्षा १२५ आणि इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.












