आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून रोजगारासाठी ‘अर्टिगा’ वाहनाचे वितरण
सेवा हीच खरी श्रद्धा – आणि तीच माझी शपथ आहे!
काल दिनांक १५ जून २०२५ रोजी, गुरुदेव पूज्य राष्ट्रसंत नम्रमुनी महाराज साहेब यांच्या मंगल आशीर्वादाने ‘आत्मनिर्भर अभियान’ अंतर्गत एक विशेष टप्पा गाठला गेला आहे. या अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले असून, या काळात ८,००,००० हून अधिक मोफत भोजनाचे वाटप करण्यात आले आहे, आणि ही सेवा अजूनही अखंडपणे सुरू आहे. हा केवळ आकडा नाही, तर हजारो गरजूंच्या पोटातील भूक शमवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
तसेच, काल सेवाभावी भावनेने ‘अर्टिगा’ वाहनाचे वितरण करून लाभार्थ्यांना स्वतःहस्ते ध्वज दाखवून गाडी अर्पण करण्याचा सन्मान मला लाभला. या वाहनांच्या माध्यमातून केवळ स्वयंपूर्णतेकडे नव्हे, तर रोजगार आणि आत्मसन्मानाकडेही एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा आणि आत्मनिर्भरतेचा प्रकाश पोहोचावा. ‘आत्मनिर्भर अभियान ‘च्या माध्यमातून जे कार्य सुरू आहे, त्याचा विस्तार भविष्यात आणखी व्यापक स्वरूप घेईल, याच विश्वासाने आजचा दिवस स्मरणात राहील.
या सेवाभावी कार्यात मार्गदर्शन करणाऱ्या नम्रमुनी महाराज साहेबांचे, तसेच सर्व सहभागी कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.








